योजनेचे नाव -
एकदिवशीय सुधारित पक्षांच्या १०० पिल्लांचे वाटप करणे .
टीप :-
१ लाभार्थी निवडताना 30
टक्के महिलाना प्राधान्य देण्यात यावे..
• लाभार्थी निवडीचे निकष - प्राधान्यक्रम ( उतरत्या
क्रमाने )
१) दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी
२) अत्यल्प भूधारक शेतकरी (१ हेक्टर पर्येंतचे
भूधारक)
३) अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर
पर्येंतचे भूधारक)
४) सुशिक्षित बेरोजगार ( रोजगार व स्वयंरोजगार
केंद्रात नोंद असलेले.)
5) महिला बचत गटातील लाभार्थी
(अंक १ ते ४ मधील )
एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.
अ.क्र.
|
बाब
|
एकदिवशीय पक्षांच्या पिल्लांचे
गट (१०० पिल्ले)
|
1
|
पक्षी
किंमत
|
२,००० /-
|
2
|
खाद्यवरील
खर्च
|
१२,४०० /- (८०० किलोग्रॅम)
|
३ |
वाहतूक
खर्च
|
१००
/-
|
४ |
औषधी
|
१५०
/-
|
५ |
रात्रीचा
निवारा
|
१,००० /-
|
६ |
खाद्याची
भांडी
|
३५०
/-
|
एकूण किंमत
|
१६,००० /-
|
एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व
स्वहिस्सा मर्यादा खालीलप्रमाणे राहील .
अ.क्र.
|
प्रवर्ग
|
एकदिवशीय पक्षांच्या पिल्लांचे
गट (१०० पिल्ले)
|
1
|
सर्व
प्रवर्ग ५० टक्के
|
८,००० /-
|
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -
१) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
२) * सातबारा (अनिवार्य)
३) * ८ अ उतारा (अनिवार्य)
४) * *
अपत्य दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
५) * आधारकार्ड (अनिवार्य )
६) * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
७) * अनुसूचीत जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास
अनिवार्य)
८) रहिवासी प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
९) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र
(असल्यास अनिवार्य)
१०) बँक खाते पासबुक सत्यपत्र (असल्यास
अनिवार्य)
११) रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच
कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला (असल्यास अनिवार्य
)
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र
किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय - जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार
कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची
छायांकित प्रत
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.