योजनेचे नाव - दोन दुधाळ गाई /म्हशी चे वाटप करणे .
संकरित गाय - एच.एफ.
/ जर्सी म्हैस - मुऱ्हा / जाफराबादी
देशी गाय – गीर, साहिवाल, रेड
सिंधी, राठी, थारपारकर
देवनी, लाल कंधारी, गवळाऊ
व डांगी
टीप :
1.सदरील योजना ही या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई
उपनगरे तसेच दुग्धोत्पादनामध्ये स्वयंपूर्ण असलेले पुणे, सातारा,सांगली,सोलापूर,कोल्हापूर
व अहमदनगर ह्या जिल्हया अंतर्गत राबवली जाणार नाही.
•
लाभार्थी
निवडीचे निकष - प्राधान्यक्रम ( उतरत्या क्रमाने )
१. महिला बचत गट
(अ.क्र. २ ते ३ मधील )
२. अल्प भूधारक (१
हेक्टर ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक )
३. सुशिक्षित
बेरोजगार (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोंद असलेले )
एका गटाची प्रकल्प किंमत खालीलप्रमाणे राहील.
अ.क्र.
|
बाब
|
२ जनावरांचा गट (रक्कम रुपयात )
|
1
|
संकरित गाई /म्हशी चा गट - प्रति गाय /म्हैस रु. ४०,०००/- प्रमाणे
|
८०,०००
|
2
|
जनावरांसाठी गोठा
|
०
|
3
|
स्वयंचलित चारा कटाई यंत्र
|
०
|
4
|
खाद्य साठविण्यासाठी शेड
|
०
|
5
|
५.७५ टक्के (अधिक १०.०३ टक्के सेवाकर ) दराने ३ वर्षाचा
विमा
|
५,०६१
|
एकूण प्रकल्प किंमत
|
८५,०६१
|
एकूण गटाचे किंमतीनुसार शासकीय अनुदान व स्वहिस्सा मर्यादा
खालीलप्रमाणे राहील .
अ.क्र.
|
प्रवर्ग
|
२ जनावरांचा गट (रक्कम रुपयात)
|
1
|
शासकीय अनुदान अनुसूचीत जाती ७५ टक्के
|
६३,७९६
|
1
|
स्वहिस्सा अनुसूचीत जाती २५ टक्के
|
२१२६५. ३३
|
2
|
शासकीय अनुदान सर्वसाधारण ५० टक्के
|
४२,५३१
|
2
|
स्वहिस्सा सर्वसाधारण ५० टक्के
|
४२,५३१
|
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -
१) * फोटो
ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य)
२) * सातबारा
(अनिवार्य)
३) * ८
अ उतारा (अनिवार्य)
४) * अपत्य
दाखला (अनिवार्य) / स्वघोषणा पत्र
५) * आधारकार्ड
(अनिवार्य )
६) * ७-१२
मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र, अथवा
दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
७) * अनुसूचीत
जाती/जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
८) रहिवासी
प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य )
९) दारिद्र्य रेषेखालील
असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१०) बँक खाते पासबुक
सत्यपत्र (असल्यास अनिवार्य)
११) रेशनकार्ड /
कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल.) (असल्यास
अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास
दाखला (असल्यास अनिवार्य )
१३) बचत गट सदस्य
असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या
पानाची साक्षांकित प्रत
१४) वय - जन्मतारखेचा
पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक
पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार
कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले
असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.