कुसुम सोलर पंप योजना पुन्हा सुरु होणार | PM KUSUM SOLAR PUMP YOJARA RE-START

mahaenokari
0

कुसुम सोलर पंप योजना पुन्हा सुरु  होणार | PM KUSUM SOLAR PUMP YOJARA RE-START


शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करताना अनेक अडचणी येतात यावर पर्याय म्हणून केंद्र आणि राज्य सरकारने एक महत्त्वाची योजना आणली आहे ही योजना म्हणजे कुसुंम सोलार योजना (KUSUM SOLAR PUMP YOJANA) या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलार कृषी पंप मिळणार आहेत. त्यामुळे शेतीच्या पाण्याच्या अडचणी सुटणार शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा,योजने साठी कोणते कागदपत्र शेतकऱ्यांसाठी आवश्‍यक असणारे या योजनेसाठी कोणती शेतकरी पात्र ठरणार  या आणि अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या पोस्टच्या  माध्यमातून जाणून घेणार आहोत .


कुसुम सोलर पंप योजना पुन्हा सुरु  होणार | PM KUSUM SOLAR PUMP YOJARA RE-START
कुसुम सोलर पंप योजना पुन्हा सुरु  होणार | PM KUSUM SOLAR PUMP YOJARA RE-START


नमस्कार मंडळी मी जितेंद्र गवळी  शिक्षण केंद्र करंजाळी च्या डिजिटल प्लॅटफॉर्म APJ मराठी वर मी  आपले स्वागत करतो. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाच वर्षात पाच लाख सोलर पंप (KUSUM SOLAR PUMP YOJANA) देण्यात येणार आहेत. 


त्यापैकी पहिल्या टप्प्यातील एका वर्षासाठी एक लाख सोलार कृषी पंप मंजूर सुद्धा करण्यात आलेत आहेत.त्यामुळे तुम्ही सुद्धा आता या सोलार कृषी पंप (KUSUM SOLAR PUMP YOJANA) साठी अर्ज करू शकता राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेनुसार 3 एचपी 5 एचपी आणि 7.5 क्षमतेचे कृषी पंप मिळणार  म्हणजे अडीच एकर शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना 3.5 hp तर ५ एकर शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना ५ hp  तसेच त्यापेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना 7.5 एचपी आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेचे सोलार पंप मिळतील  महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना स्वखर्चाने यावरती वाढीव  किंवा इतर उपकरणे लावता येणार आहेत.


कुसुम सोलर पंप योजना पुन्हा सुरु  होणार | PM KUSUM SOLAR PUMP YOJARA RE-START
कुसुम सोलर पंप योजना पुन्हा सुरु  होणार | PM KUSUM SOLAR PUMP YOJARA RE-START


जे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील त्यातील खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के तर अनुसूचित जातीत येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदान असणार आहे  तर उरलेली रक्कम ही शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा म्हणून भरावी  लागणार योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाऊर्जा वेबसाईट वरती ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला या पोष्ट्च्या शेवटी  लिंक देण्यात आली आहे. 


फर्स्ट कम फर्स्ट प्रेफरन्स म्हणजे जे  शेतकरी या योजनेसाठी सर्वात आधी अर्ज करतील त्यांना सगळ्यात आधी हे कृषी पंप (KUSUM SOLAR PUMP YOJANA) मिळणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करा असे आवाहन सरकारकडून करण्यात आले राज्य सरकारने सुरू केलेली ही योजना फक्त त्याच शेतकऱ्यांसाठी ज्या शेतकऱ्यांच्या शेतात वीज पुरवठा पोहोचलेला नाही त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी ही अट लक्षात घेणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे  असणार  तर दुसरी म्हणजे शेततळे विहीर बोरवेल बारमाही वाहणाऱ्या नद्या नदी-नाल्यांच्या शेजारी असणारे शेतकरी आणि शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे सर्व शेतकरी या योजनेसाठी लाभार्थी ठरणार आहेत 


तसेच अटल सौर कृषी पंप योजना(KUSUM SOLAR PUMP YOJANA) किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना (MUKHYAMANTRI SOLAR PUMP YOJANA)अंतर्गत अर्ज करूनही अद्याप कृषिपंप न मिळालेले शेतकरी या योजनेसाठी पात्र असणार आहेत  या योजनेसाठी अर्ज करताना तुम्हाला सातबारा उतारा आधार कार्ड कॅन्सल चेक किंवा पासबुकची झेरॉक्स आणि पासपोर्ट फोटो आवश्यक असणार महत्त्वाचे म्हणजे तुमच्या शेतात विहीर कूपनलिका असतील तर सातबारा उताऱ्यावर या सगळ्या गोष्टींची नोंद असणे आवश्यक असणार  तसेच एकापेक्षा जास्त नावे  सातबार्यावर असतील तर इतर लोकांचं ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक असणार  दोनशे रुपयांच्या बाँडवर प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे तर शेत जमीन विहीर पाण्याचा पंप सामायिक असल्यास इतर भागीदारांचे ना हरकत प्रमाणपत्र सुद्धा आवश्यक असणार  त्यामुळे मंडळी लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज करा आणि योजनेचा लाभ घ्या ! 


योजनेचे नाव | Sarkari yojana Name 


कुसुंम सोलार योजना | KUSUM SOLAR PUMP YOJANA 


योजना कोणासाठी आहे ? | Sarkari Yojana Belong to  

ज्या शेतक-यांच्या शेतामध्ये लाईट पोचलेली नाही अशा शेतकरी बांधवांसाठी हि योजना आहे.


अनुदान किती मिळणार आहे ? | SOLAR PUMP YOJANA BENIFIT

अनु.जाती /अनुसूचित जमातीसाठी - ९५ % अनुदान 

ओपेन कोटा साठी - ९० % अनुदान   


कोणत्या शेतकऱ्यान कोणता सोलर पंप मिळेल ? | SOLAR PUMP YOJANA WHICH FARMER GIVE WICH TYPE PUMP

2.५  एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यान - 3 HP 

५ एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यान- 5  HP 

५ पेक्षा एकर  जास्त  जमीन असणाऱ्या शेतकऱ्यान- ७.5 


कोणाला व कश्या स्वरुपात मिळेल ? | STATUS OF APPROVAL SOLAR PUMP YOJANA

पहिल्या अर्ज करण्याऱ्या शेतकारीबंधावना पहिले या हिशोबाने मिळेल 


अर्ज करण्याची लिंक  | SOLAR PUMP YOJANA APPLY LINK

महाकृषि ऊर्जा अभियान – प्रधानमंत्री कुसुम योजना अर्ज करण्यासाठी येथे तिक करा 

 

महाकृषि ऊर्जा अभियान – प्रधानमंत्री कुसुम योजना सद्य:स्थिती

महाकृषि ऊर्जा अभियान – प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत 100000 सौर पंपांची योजना सुरु झाली आहे. यासाठी केंद्र शासनाकडून अद्याप पुरवठादार कंपन्या व दर अंतिम झालेले नाहीत, त्यास एक महिना कालावधी लागण्याची शक्यता आहे (डिसेंबर, 2021 अखेर).

दरम्यान केंद्र शासनाचे सुचनेप्रामणे मागील वर्षाचे पुरवठादार, मागील वर्षाचे दराने सौर पंप पुरविणेस तयार असतील अशा पुरवठादारांकडून देकार मागवून 2750 सौर पंपासाठी प्रथम आलेल्या अर्जदारास प्राधान्य देऊन त्याची कार्यवाही सुरु आहे.

केंद्र शासनाकडून या वर्षीचे पुरवठादार कंपन्या व दर आलेनंतरच या पुरवठादारांना जिल्हानिहाय कोटा वाटप केल्यानंतर योजनेची अपेक्षित कार्यवाही सुरु होईल. तोपर्यंत अर्जदारांची प्राथमिक माहिती / मोबाईल नोंदणी करणेत येत आहे.

केंद्र शासनाकडून सौर पंप पुरवठादार व दर ठरवून मिळाले व राज्य शासनाचे सुकाणू समितीकडून जिल्हानिहाय पुरवठादारास वाटप झालेनंतर अर्जदारांना प्राधान्यक्रमानुसार SMS पाठविणेत येतील. त्यानंतरच अर्जदारांची संपूर्ण माहिती भरणे, कोटेशन देणे, लाभार्थी हिस्सा स्विकारणे, कंपनी निवडणे व सौर पंप आस्थापित करणे ह्याबाबी शक्य होतील.

सद्य:स्थितीत होणाऱ्या विलंबा बाबत दिलगीर आहोत.

महाऊर्जा/ मेडा


Post a Comment

0Comments

आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.

Post a Comment (0)