महाराष्ट्र शासन
राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ साठी सामायिक प्रवेश परीक्षा (सीईटी) बाबत जाहिरात
महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC) मुंबई, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर यांच्यासह यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (YASHADA) संचालित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (ACEC) पुणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI) पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC ) संचालित सावित्रीबाई फुले अॅकॅडमी, पुणे, अंबरनाथ नगरपालिका संचालित युपीएससी स्पर्धा परीक्षा केंद्र ( UPSCCETC ) अंबरनाथ ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था (CDIAC ) ठाणे यांचेमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२४ साठी पूर्णवेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरिता सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून सर्व शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या इच्छुक पात्र उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक :
१ ऑनलाइन अर्ज
दि. १४.०७.२०२३ ( पासून) दि. १४.०८. २०२३ ( पर्यंत)
२ अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक
३ परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक
दि. १५.०८.२०२३
४ लेखी प्रवेश परीक्षा दिनांक
दि. २७.०८.२०२३
टीप :
१. विद्यार्थ्यांना प्रवेश लेखी परीक्षा आणि मुलाखतीतील प्राप्त गुण व त्यांनी प्रशिक्षण केंद्रासाठी दिलेला विकल्प या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल. लेखी परीक्षेनंतर मुलाखतीचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले जाईल.
२. सामायिक प्रवेश परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश पोर्टलवर लॉग इन करून त्यांच्या पसंतीचे प्रशिक्षण केंद्र प्रवेशासाठी निवडावे.
३. प्रवेश प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना कोणतीही माहिती वैयक्तिकरित्या उपलब्ध करून दिली जाणार नाही. प्रवेश प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती SIAC च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली जाईल.
सविस्तर जाहिरात, परीक्षेचा अभ्यासक्रम, पात्रता, ऑनलाइन अर्ज भरण्याविषयी सूचना
शासनामार्फत दिले जाणारे विद्यावेतन व इतर माहिती www.siac.org.in या
संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
दिनांक : ११.०७.२०२३ स्थळ : मुंबई
डीजीआयपीआर / २०२३-२४ / २०७९
सही/-
डॉ. स्वाती वाव्हळ संचालक, SIAC, मुंबई समन्वयक, सामायिक प्रवेश परीक्षा
आपण आम्हाला भेट दिलीत धन्यवाद आम्ही लवकरच आपल्या कमेन्ट चे उत्तर देऊ तो पर्यंत वाट पहा.