Color Posts

Type Here to Get Search Results !

Adivasi Bharti | आदिवासी समाजाच्या 12500 जागांसाठी मेगा बंपर भरती.

0

Adivasi Bharti | आदिवासी समाजाच्या 12500 जागांसाठी मेगा बंपर भरती.

Adivasi Bharti | आदिवासी समाजाच्या 12500 जागांसाठी मेगा बंपर भरती.
Adivasi Bharti | आदिवासी समाजाच्या 12500 जागांसाठी मेगा बंपर भरती.


विषय: आदिवासी समाजाच्या १२,५०० पदांची पदभरती करण्याबाबत.

महत्वाचे मुद्दे:

  1. पार्श्वभूमी: अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे काही कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याचे आदेश दिनांक २१.१२.२०१९ च्या शासन निर्णयानुसार देण्यात आले होते.
  2. रिक्त पदे: त्यामुळे अनुसूचित जमातीची काही पदे रिक्त झाली आहेत.
  3. निर्देश: संबंधित विभागांना या रिक्त पदांची विशेष भरती मोहिमेच्या माध्यमातून भरती करण्याचे निर्देश देण्यात आले होते:
    • गट अ आणि ब पदे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत असलेल्या पदांची भरती ३१.१२.२०२३ पर्यंत करावी.
    • गट क आणि ड पदे: ३१.०७.२०२३ पर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करावी.
  4. समस्या: अद्यापही ही विशेष भरती मोहिम राबवली नसल्याचे डॉ. संदिप प्रभाकरराव धुर्वे यांच्या २८.०६.२०२४ च्या पत्रात निदर्शनास आणून दिले आहे.
  5. विनंती: जर आपल्या विभागात अद्याप भरती प्रक्रिया सुरू केली नसेल तर ती तात्काळ सुरू करावी.

सहाय्यक:
(र.अं. खंडसे)
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत: डॉ. श्री. संदिप प्रभाकरराव धुर्वे, यवतमाळ.

--------------------------------------------------

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग ४ था माळा, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२


दुरध्वनी क्र. ०२२-२२७९४०१३

Email-   archana.tamore@nic.in

क्र. :       संकीर्ण-१२२४/प्र.क्र. १६८/आरक्षण-२,

दिनांक:- १३ ऑगस्ट, २०२४.


प्रति,

अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव,

सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.


विषय :- आदिवासी समाजाच्या १२ हजार ५०० पदांची पदभरती करण्याबाबत.


संदर्भ:-

१) सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. बीसीसी २०१८/प्र.क्र.३०८/१६- ब, दि.२१.१२.२०१९.

२) सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. बीसीसी२०१९/प्र.क्र.५८१ ए/१६- ब, दि.१४.१२.२०२२.

३) मा. डॉ. श्री. संदिप प्रभाकरराव धुर्वे, वि.स.स. यांचे दि. २८.०६.२०२४ चे पत्र



महोदय/महोदया,

अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे संबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याचे आदेश संदर्भाधिन क्र. १ येथील दि.२१.१२.२०१९ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेले आहेत.


सदर कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग केल्यामुळे अनुसूचित जमातीची रिक्त झालेली पदे संबंधित विभागांनी कालबध्द कार्यक्रम आखून विशेष भरती मोहिम राबवून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अखत्यारितील पदे भरण्याची कार्यवाही दि.३१.१२.२०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे, तसेच गट क व गट ड मधील पदे भरण्याबाबतची कार्यवाही दि.३१.०७.२०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश संदर्भाधिन क्र. २ येथील दि.१४.१२.२०२२ च्या शासन निर्णयान्वये देण्यात आलेले आहेत.


तथापि, अद्यापही सदर विशेष भरती मोहिम राबवून पदभरती केली नसल्याचे डॉ. श्री. संदिप धुर्वे, वि.स.स. यांनी त्यांच्या संदर्भाधिन क्र. ३ येथील दि.२८.०६.२०२४ च्या पत्रान्वये निदर्शनास आणून दिलेले आहे.


सबब, या विभागाच्या दि.२१.१२.२०१९ व दि.१४.१२.२०२२ च्या शासन निर्णयानुसार आपल्या विभागांतर्गत अद्याप पदभरतीची कार्यवाही केली नसल्यास ती विनाविलंब तात्काळ सुरू करावी अशी आपणास विनंती आहे.


आपला,


(र.अं. खंडसे)

उप सचिव, महारोष्ट्र शासन

प्रतः- मा. डॉ. श्री. संदिप प्रभाकरराव धुर्वे, वि.स.स. यवतमाळ.


Social Media Leak  - Pdf

Post a Comment

0 Comments

Top Post Ad | MahaNokri

Below Post Ad | MahaNokri